मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान सांगलीमधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सध्या सांगलीमध्ये आतापर्यंत 26 कोरोना रुग्ण असल्याचे समोर आले होते. यापैकी आता 22 रुग्ण बरे झाले आहेत. या 22 रुग्णांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 26 मधील 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 वर आली आहे. या 22 कोरोनामुक्त रुग्णांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जाणार आहे. , नियमानुसार त्यांना काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ही एक सकारात्मक घटना घडली आहे. याशिवाय यामुळे जनमानसात कोरोनाबाबतची भीतीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.