जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखेमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे स्वागत करण्यात आले.
शाडू मातीची मूर्ती असलेल्या घरगुती गणपतींचे विसर्जन घरातच बादलीमध्ये करणाऱ्या नागरिकांना अंनिसमार्फत सन्मानपत्र देण्यात आले.

खोटे नगर, शंकर अप्पा नगर, पिंप्राळा येथे अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांच्या हस्ते सन्मानपत्र ठाकरे कुटुंबाने स्वीकारले . पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या अन्य कुटुंबियांनाही अंनिसने सन्मानित केले. या प्रसंगी अॅड.भरत गुजर, शिरीष चौधरी उपस्थित होते.







