मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) गुजरातेत गांधीनगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सर्वच राजकीय पक्षाकडून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. या टीकानंतर आयएफएससी गुजरातला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारनेच घेतला होता, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, आयएफएससी मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला आता महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे… आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.
Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार
✔
@ShelarAshish
आयएफएससी मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच एकमेव प्रस्ताव पाठवला, तो आजही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे नुसत्या बोंबा मारण्यापेक्षा चला आता महाराष्ट्राने एकत्रपणे केंद्राकडे… आयएफएससी मुंबईत झाले पाहिजे म्हणून सांगू या!(2/2)
994
5:33 PM – May 6, 2020
Twitter Ads info and privacy
247 people are talking about this
तसेच शेलार यांनी अर्थमंत्री निर्माला सितारमन यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. पुन्हा एकदा हे संसदेतील तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण स्पष्ट करते आहे की, आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला. ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता, असे शेलार यांनी म्हटले आहे.
Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार
✔
@ShelarAshish
पुन्हा एकदा हे संसदेतील तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांचे भाषण स्पष्ट करते आहे की,आयएफएससी गांधीनगरला करण्याचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला.ते मुंबईला व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेच प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता.(1/2) @BJP4Maharashtra