जामनेरात तालुक्यात दर आठवड्याला होणार शिबिर
जामनेर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरात दोन मुलीवर एक तर तीन शस्त्रक्रिया दोन अपत्य असलेल्या पुरुषांवर करण्यात आल्या.
पत्नीस आरोग्याच्या दृष्टीने त्रास नको म्हणून सदर पुरुषांनी स्वतः वर शस्त्रक्रिया करून घेतली. महिलांपेक्षा पुरुषांची नसबंदी सगळ्यात सोपे व सुटसुटीत असते. त्यामुळे पुरुषाने नसबंदीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या कडून शस्त्रक्रिया केलेल्यांचा शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यापुढे दर आठवल्याला पुरुष नसबंदी शिबिर घेणार असल्याचे डॉ. धापते यांनी सांगितले. शिबिर यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. नरेश पाटील, डॉ. कोमल देसले, डॉ. दानिश खान, डॉ. किरण पाटील तालुका पर्यवेक्षक बशीर पिंजारी, राजेंद्र कुमावत, आरोग्य सहाय्यक दिनकर माळी, विक्रम राजपूत, सोपान राठोड, सुनील बोरसे, किशोर पाटील, रवीद्र सूर्यवंशी, स्वप्निल महाजन व प्रा.आ. केंद्र नेरीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.