जामनेर ;- तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी अंतर्गत दुसर्या टप्प्यात लसीकरण आज़ ४ रोजी नेरी बुद्रुक येथे कोविड लसीकरन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यात नागरिकांना लसीकरण करण्यात आले .वैद्यकीय अधिकारी डॉ सारिका भोळे ,डॉ सीमा तडवी ,आरोग्यसाहिका कुलकर्णी,जे एन दोडे,आरोग्यसेवक विजेंद्र पवार ,गटप्रवर्तक नीलिमा गवळी, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले .
शिबिरस्थळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, यांनी भेट दिली . सरपंच कल्पना कुमावत , ग्रामपंचायत सदस्य भगवान इंगळे ,कल्पेश बेलदार ,दत्ता ईधाटे,सागर कुमावत, गणेश कुमावत व ग्रामस्थांनी लसीकरणासाठी सहकार्य केले .