उर्वरित ९ जणांवर काठमांडूला उपचार सुरु
जळगाव (विशेष वृत्त) : नेपाळ देशात देव दर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला दरीत कोसळून अपघात झाला होता. यात २७ जण मृत्युमुखी पडले होते. तर १६ जण जखमी होते. या १६ पैकी ७ जखमींना काठमांडू येथून मुंबई येथे विशेष विमानाने पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. हे ७ जखमी भाविक सोमवारी दि. २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजेला पोचले असल्याची माहिती मिळाली आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, दर्यापूर यासह मुक्ताईनगर येथील भाविक उत्तरप्रदेश व नेपाळ येथे देवदर्शनाकरिता गेले होते. नेपाळ येथील काठमांडू येथे जात असताना त्यांची खाजगी बस हि दरीत व नदीत कोसळून मोठा अपघात झाला होता.(केसीएन)यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुणी बेपत्ता आहे. तसेच १६ जण जखमी होते. यातील जखमींवर काठमांडू येथेच उपचार सुरु होते.
दरम्यान, जखमींपैकी वरणगाव येथील वर्षा पंकज भंगाळे, कुमुदिनी झांबरे, हेमराज राजाराम सरोदे, रूपाली हेमराज सरोदे, नीलिमा भिरुड तर भुसावळ येथील सुनील धांडे, भारती पाटील असे सात जण यांना विशेष इंडिगो विमानाने दुपारी ४ वाजता काठमांडू येथील विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. (केसीएन) हे सर्व जण संध्याकाळी मुंबईत आले सून त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती आ. संजय सावकारे यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे. तर आता काठमांडू येथे या अपघातातील उर्वरित जखमी सीमा इंगळे, रेखा प्रकाश कोळी, शारदा सुनील पाटील, ज्ञानेश्वर बोंडे, आशा बोंडे, आशा पांडुरंग पाटील, प्रवीण पांडुरंग पाटील, अविनाश भागवत पाटील, अनंत इंगळे यांच्यावर काठमांडूत उपचार सुरु आहेत.