जळगाव ( प्रतिनिधी ) ;- गगनाला भिडलेली महागाई, वाढलेले पेट्रोलचे दर आणि ढासळत असलेली देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेरी ता. जामनेर येथील कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केंद्र सरकारचे उपसहात्मक पर अभिनंदन करणारे 500पत्र पाठवून केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी सरकार विरोधात निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली… यावेळी ज्येष्ठ नेते अशोक कोळी, राजू पाटील,सरपंच दिनू आबा पाटील, मा.सरपंच ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे मा.तालुकाध्यक्ष किशोर खोडपे, सोशल मीडिया प्रमुख निलेश बोदडे मा.उपाध्यक्ष आशिष दामोदर,नेरी युवा गट प्रमुख रुपेश पाटील,नेरी गण प्रमुख शुभम मोगरे,नेरी शहराध्यक्ष पवन वाघ,विद्यार्थी प्रमुख विवेक कुमावत,जळगांव शहर सरचिटणीस गणेश पाटील,स्वप्नील पाटील,हृषीकेश पाटील,शुभम खोडपे, यश सोनार,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.