जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथील नायगाव शिवारातील शेतात बांधलेल्या गायीचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या घटने मुले परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार डीगंबर विक्रम बोबडे यांचे नायगाव शिवारात शेत असून त्यांनी आपल्या शेतात साडेतीन वर्षांची गाय शनिवारी १० रोजी बांधलेली होती. मात्र आज सकाळी डिंगबर बोबडे हे शेतात आले असताना त्यांना गाय मृतावस्थेत आढळून आली . घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आले असून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांकडूबा व्यक्त होत आहे.