जळगाव (प्रतिंनिधी) – येथील कोल्हे हिल्स परिसरातील नवनाथ नगरात श्री साईधाम मंदिराची स्थापना करण्यात आली असून साईबाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नुकतीच करण्यात आली. त्यापूर्वी परिसरात भव्य मिरवणूक काढून साईबाबांचा जयघोष करण्यात आला.
नवनाथ नगर येथील नागरिकांनी श्री साईबाबा यांच्या मंदिराचे निर्माण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार श्री साईधाम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मंदिरासाठी श्री साईबाबांची मूर्ती मुंबई येथील शिल्पकाराकडून तयार करण्यात आली. काही दिवसांपूर्वी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला वर्गाने डोक्यावर मंगल कलश घेतले होते. तर श्री साईनाथ महाराज की जय हा जयघोष भाविक करीत होते.
श्री साईधाम मंदिर येथे सदर मिरवणुकीचा समारोप झाला. तेथे क्रेनच्या सहाय्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावेळी भाविकांनी एकच जल्लोष केला. भाविकांनी फुलांच्या वर्षावात श्री साईबाबा यांच्या मिरवणुकीची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अध्यक्ष जितेंद्र करोसिया, अनिल बागलाणे, महेंद्र पाटील, गणेश भोईटे, गणेश ठाकूर, संदीप बोरसे, किशोर कुलकर्णी, भूषण पाटील, राहुल बेलदार, शिवपाल सैनी, राजू सोनवणे, दीपक सोनवणे, किरण खैरनार,संजय ठाकूर, निलेश मोरे आदी पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.