जळगाव ( प्रतिनिधी ) – खंडेरावनगर भागात शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या घरात शुक्रवारी दुपारी दोन ते तीन दिवसांचे नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळले आले रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
खंडेराव नगरात भाडेकरारावरील एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे राहतात. या घराचे पक्के बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली.
रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो नि विजय शिंदे, पो उ नि गोपाळ देशमुख, सागर देवरे, नितेश बच्छाव, भूषण पाटील, अतुल चौधरी, संजय तडवी, रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हे अर्भक ठेवले असल्याची माहिती मिळाली असुन रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पो उ नि गोपाळ देशमुख करीत आहेत.