जळगाव ( प्रतिनिधी ) – अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नशिराबाद येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यात नशिराबाद येथील माजी सरपंच व माजी ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता.

नशिराबाद नगरपरिषद झाल्यामुळे लवकर आगामी काळात पहिल्यांदा निवडणुक होत आहे. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी नशिराबाद नगरपरिषदेच्या निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नशिराबाद येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष विकास धनगर यांच्या उपस्थितीत नशिराबादचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माळी, आबा पाटील, पराग देवरे, युसुफ शोख (भंगारवाले), मनोज माळी, महेश पाटील, किरण पाटील, सत्तार शेख, संजय महाराज, सुपडु चौधरी अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष विकास धनगर, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, बापू चौधरी, शिवसेना युवक जिल्हाप्रमुख चेतन बऱ्हाटे, बापू चौधरी, कैलास नेरकर, विजय वाणी, प्रभाकर महाजन यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.







