जळगाव तालुक्यात महामार्गावर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या निखिल संतोष सपकाळे (३१, रा. साकेगाव, ता. भुसावळ) यांच्यावर दोन जणांनी धारदार शस्त्राने वार केले. ही घटना २६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव ते भुसावळ मार्गावर एका रुग्णालयाजवळ सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी निखिल सपकाळे गेले असता त्यांच्यावर दोन जणांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये हातावर आणि पंजावर गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी सपकाळे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विजय कोळी करीत आहेत.