जळगाव ( प्रतिनिधी ) – जैन डिव्हाईन पार्कमधील निरामय नॅचरोपॅथी सेंटरच्या प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांचा नाशिक येथील HEAL-2025 (Health Education for Adaptive Learning) ‘अॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत संशोधन रिसर्च पेपर सादर केला, त्यात त्यांचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने, तसेच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज फिजियोथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांचा (Exemplary leadership award) अनुकरणीय नेतृत्त्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर नागूलकर दाम्पत्याला मिळालेल्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले आहे.
HEAL-2025 ही नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फिजिओथेरपी कॉलेजद्वारे आयोजित केलेली एक बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद होती. दि. २६ ते २७ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास २०० फिजियोथॅरपिस्टसचा सहभाग होता. डॉ. जयवंत नागलूकर व डॉ. कल्याणी नागूलकर यांच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार परिषद, मुंबईचे अध्यक्ष डॉ. सुदीप काळे, मराठा विद्या प्रसारक समाज फिजियोथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमृत कौर उपस्थित होते.
आरोग्यसेवा शिक्षणात नवीन नवोपक्रम निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आरोग्यसेवा शिक्षणात सुधारण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून HEAL- २०२५ परिषदेकडे बघितले जाते. संशोधक, अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन रिसर्च पेपर सादर केलेत. त्यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांनी पेपर सादरीकरण स्पर्धेमध्ये (paper presentation competition) भाग घेतला होता. त्यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांनी वरिष्ठ श्रेणीतील विषयानुसार वैज्ञानिक पेपर सादरीकरण केला. (senior category subject specific scientific paper presentation) यामध्ये हात पुनर्वसनाचे मेटा विश्लेषण : संशोधनावर आधारित वापर आणि परिणामकारकता यावर त्यांनी प्रकाश टाकला. (Meta analysis on hand rehabilitation : Usage and effectiveness based on research from 2020-2025) यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यासोबतच काही पुरस्कार देखील देण्यात आले ज्यामध्ये डॉ जयवंत नागूलकर यांना exemplary leadership award प्राप्त झाला. नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉक्टर नागुलकर दाम्पत्याला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.
फोटो ओळ (NSK) : ‘अॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी नागूलकर आणि डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव करताना डॉ. मिलिंद निकुंभ, अॅड नितीन ठाकरे, डॉ. सुदीप काळे, प्राचार्य डॉ. अमृत कौर.