जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव ते चांदवड या दरम्यान सुरू असलेल्या नॅशनल हायवेवर नांद्रा गावाजवळील खोळंबलेल्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भात व तसेच विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नांद्रा ग्रामपंचायतीने तसेच ग्रामस्थांनी दिनांक 28 जुले 2021रोजी नांद्रा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिले होते.


सदर निवेदनाची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशान्वये व प्रांताधिकारीश्री कचरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा तहसीलदार श्री कैलास चावडे यांनी त्यांच्या दालनात आज बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला माननीय पोलीस निरीक्षक श्री किसन नजन पाटील नायब तहसीलदार संभाजी पाटील पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे सरपंच विनोद पाटील माजी सरपंच सुभाष तावडे माजी सरपंच शिवाजी तावडे ग्रा प सदस्य आनंदा बाविस्कर यशवंत पवार किशोर पाटील अभिमन पाटील संतोष ब्राम्हणे अशोका बीडकॉनतर्फे इंजिनीयर श्री बोरसे हे उपस्थित होते निवेदनातील मागणी प्रमाणे दलित वस्तीत जाणारे शेतातील पाणी पाईप टाकून बाहेर काढण्याचे तसेच विष्णुदास महाराज यांच्या आश्रमाकडे जाणारा रस्त्यात पाईप टाकून अडीचशे मिटर रस्ता करून देण्याचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रस्ता व्यवस्थित करून देण्याचे ठरले त्याच प्रमाणे बस स्टैंड वर तोडलेल्या मुताऱ्या व दलित वस्ती समोरील रस्ता ताबडतोबीने पूर्ण करण्यासाठी नॅशनल हायवे च्या उपविभागीय अभियंता यांच्याकडे प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेण्याचे ठरले यासंदर्भात उद्या दिनांक 28 जुलै 2021 रोजी पुन्हा नॅशनल हायवे चे अधिकाऱ्यांसमवेत माननीय तहसीलदार सो पाचोरा यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणारआहे आजच्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्यामुळे उद्या चे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.







