यावल तालुक्यातील दहिगाव येथील घटना
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील दहिगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनंजय दिलीप महाजन (वय-२९, रा. दहिगाव ता. यावल) असे मृत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे. धनंजय महाजन हा यावल तालुक्यातील दहिगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामाला होता. शनिवारी १ जुलै रोजी नायगाव रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळ काहीतरी विषारी द्रव्यसेवन करून आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याला पाणी पुरवठ्यावर कार्यरत असलेले गटु पाटील हे कामानिमित्त पाण्याच्या टाकीवर गेले असता त्या ठिकाणी धनंजय दिलीप महाजन हा बेशुद्ध अवस्थेत आढळुन आला.
त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना १ जुलै रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. ग्रामपंचायत मध्ये एका वर्षापुर्वीच पाणी पुरवठ्यावर कर्मचारी म्हणून कामास तो लागला होता. त्याने आत्महत्या का केली ते समजू शकले नाही. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.