जळगावातील सम्राट कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील सम्राट कॉलनीत तरुणाने कुठल्यातरी नैराश्याखालीआल्यानंतर पत्नीला, वरच्या रुमवर जावून येतो,असे सांगत वरच्या मजल्यावर जावून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवार ५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील सम्राट कॉलनीत घडली. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
सुनील मधुकर चौधरी (३५, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील चौधरी हे मुळ विरवाडे ता.चोपडा येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते सम्राट कॉलनीत पत्नी वैशाली, मुलगा कृष्णा (वय ७),लहान मुलगा सोनू (वय ४) असे वास्तव्यास आहेत. ते शहरातील बोहरा गल्लीत एका हार्डवेअरच्या दुकानावर कार्यरत होते. आज गुरुवारी सकाळी ८. ३० वाजता सुनील चौधरी यांनी त्यांच्या मोबाइलवरुन शहरात वास्तव्यास असलेले त्यांचे मावसभाऊ भुषण चौधरी यांच्याशी संपर्क साधून गप्पा केल्या. त्यानंतर पत्नी, मुले यांच्याशीही त्यांनी नेहमी सारखा संवाद साधला. वरच्या खोलीतून येतो,असे पत्नीला सांगून ते वरच्या मजल्यावर गेले.
वरच्या खोलीत जाऊन त्यांनी नैराश्याखाली येत गळफास लावला. त्यांच्या पत्नी वरच्या मजल्यावर गेल्या असता त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर प्रकार समोर आला. सुनील यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने पत्नी, मुले, नातेवाईक तसेच स्नेहीजणांना जबर धक्का बसला. घटना कळताच नातेवाईक तसेच्या त्यांच्या मित्रांनी त्यांच्या घरी धाव घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.