भडगाव तालुक्यातील कजगाव येथील घटना


भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कजगाव मार्गावरील शंकर नगर मधील नर्मदेश्वर महादेव मंदिरात दि.१५ रोजी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी दान पेटी लांबवली. घटनेची पोलीस माहिती घेत होते.
कजगाव येथे शंकर नगर भागातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात दि.१५ रोजी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी मंदिराची दान पेटी लांबवली. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इतरांना कळवले. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. भर वस्तीत असलेल्या मंदिरात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे भाविक भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी सदर घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी भाविक भक्तांनी केली आहे.









