नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात दररोज करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २४ तासांमध्ये देशात २२ हजार ७७१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधितांच्या ही आतापर्यँतची सर्वात मोठी वाढ आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. यानुसार, आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.







