जळगाव(प्रतिनिधी)-आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ५५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे.
आज जिल्हा माहिती कार्यालयाने सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून रूग्णसंख्येचे अपडेट दिले आहे. यानुसार-आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे. यात भुसावळ येथील १४, भडगाव ५, जळगाव ग्रामीण २, चोपडा ५, एरंडोल ३, अमळनेर ११, यावल ४, रावेर ८ आणि जामनेर १ अशा रूग्णांचा समावेश आहे. तर दोन रूग्णांचा पत्ता पूर्ण देण्यात आलेला नाही.