केप टाऊन (वृत्तसंस्था) – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. पत्नी डॅनिएल डिव्हिलियर्सने बेबी बम्पचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली. डॅनिएल डिव्हिलियर्सने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ‘हॅलो बेबी गर्ल’ असे कॅप्शन लिहिले आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पडला. (South African former Captain AB de Villiers and wife Danielle de Villiers to have third child together)
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही पती विराट कोहलीचा ‘रॉयल चॅलेंजर्स’मधील सहखेळाडू एबी डिव्हिलियर्सचे अभिनंदन केले. ‘अभिनंदन डॅनिएल आणि एबी. किती आनंदाची बातमी’ अशी कमेंट अनुष्काने केली.
तिसर्या बाळाचे स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे. डिव्हिलियर्स दाम्पत्याला दोन मुले आहेत. मोठा मुलगा अब्राहम पाच वर्षांचा तर धाकटा जॉन रिचर्ड तीन वर्षांचा आहे.