जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यात मागील ४-५ दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून सदरच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती मध्ये फुटभर पाणी साचले आहे. या बाबत प्रत्यक्ष पाहणी वेळी व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असून जिल्ह्यातील उडीद पिक काढणीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेले आहे तसेच मूग व सोयाबीन पिक देखील काही ठिकाणी काढणीस आलेले आहे. त्यामुळे सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व पूर सदृस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.आपण तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित विमा कंपनी व कृषी विभागास तात्काळ सूचना द्याव्यात अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की जिल्ह्यात मागील ४-५ दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून सदरच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती मध्ये फुटभर पाणी साचले आहे. या बाबत प्रत्यक्ष पाहणी वेळी व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असून जिल्ह्यातील उडीद पिक काढणीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेले आहे तसेच मूग व सोयाबीन पिक देखील काही ठिकाणी काढणीस आलेले आहे. त्यामुळे सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व पूर सदृस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.आपण तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित विमा कंपनी व कृषी विभागास तात्काळ सूचना द्याव्यात तसेच सदरील पिक विमा च्या शासन निर्णयाच्या (अ.क्र.१०.२) प्रतिकूल हवामान परिस्थिती, (अ.क्र.१०.४) स्थानिक आपत्ती व (अ.क्र.१०.५) काढणी पश्चात झालेले नुकसानीची भरपाई याचा देखील आढावा घेऊन तात्काळ आपण आदेश निर्गमित करावे. तसेच *ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला नसेल असे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून तात्काळ शासनास झालेल्या नुकसानीचे अहवाल सादर करणे बाबत कारवाई करावी.आपण तात्काळ याविषयी विशेष लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी म. जिल्हाधिकारी* यांना दिलेल्या पत्रात केली आहे. या आशयाचे पत्र कार्यवाहीसाठी मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सो, जळगाव यांना देण्यात आले आहे.