बोदवड तालुक्यातील हिंगणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यात हिंगणे शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्याला मार लागलेला दिसत असून नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. बोदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
शरद अशोक पाटील (वय ३५, रा. हिंगणे ता. बोदवड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गावात आई, भाऊ यांचेसह राहतात.बोअरिंगचे कामे करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)दरम्यान, गुरुवारी दि. २७ मार्च रोजी पहाटे २ वाजता हिंगणा गावाजवळ अधिराज ढाबाजवळ शरद पाटील हे बेशुद्ध स्थितीत असल्याबाबत त्यांचे प्रताप पाटील यांना पोलीस पाटलांनी कळविले. नंतर बोदवड रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला.
मात्र मयत शरद पाटील यांच्या डोक्याला जखमा असल्यांचे आढळून आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.(केसीएन) दरम्यान, बोदवड पोलीस स्टेशनला माहिती मिळताच निरीक्षक अरविंद भोळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी नातेवाईकांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. तर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी घेऊन गेले आहेत. तर बोदवड पोलीस पुढील तपास करीत आहे. हिंगणे गावात शोककळा पसरली आहे.