भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी येथील ; मृतदेहाशेजारी बसलेल्या भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीतील कर्मचारी असलेल्या दोघं भावात आर्थिक कारणावरून वाद झाले. वाद विकोपाला जाऊन मोठया भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर आपटून बॅटचा जोरदार फटका मारून जागीच ठार केल्याची घटना बुधवार दि ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तो मयत भावाच्या डोक्याजवळच बसून होता. वरणगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठया भावाला ताब्यात घेतले आहे.की गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४०, रा. वरणगाव फॅक्टरी ता. भुसावळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. आयुध निर्माणीत तो कामाला होता. त्याच परिसरात तो परिवारासह होता. प्रदिप जयसिंग इंगळे हे दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले.(केसीएन) थोड्याच वेळात मुक्ताईनगर येथुन मोठा भाऊ सतिष जयसिंग इंगळे बँकेच्या कामासाठी वसाहतीतील त्यांच्या घरासमोरील स्टेट बँकेत आला होता. बँकेतून लहान भावाकडे गेला होता. घरात दोन्ही भावात आर्थिक वादातून हाणामारी झाली. त्यात मोठया भावाने लहान भावाचे डोके भिंतीवर आपटले.
दरम्यान भाऊ मदतीसाठी गयावया करीत होता. मात्र सतीशने क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यावर जोरदार वार करीत प्रदिपला जागीच ठार केलं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेत संशय संशयित मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत सतीश हा मयत भावाच्या डोक्याजवळच बसून होता. (केसीएन)सतिष इंगळे व प्रदिप इंगळे हे दोघे भाऊ आयुध निर्माणीत होते. मात्र सतिष हा काही महिन्यापूर्वी बंदुकीच्या गोळी चोरी प्रकरणी निलंबीत होता. या दोघा भावात भांडण कशामुळे झाले होते, हे मात्र अद्याप समजले नाही. घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.