जळगावातील म्युन्सिपल कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील म्युनसिपल कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकास अरूण बाविस्कर (वय ३६ रा. म्युन्सीपल कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण कुटुंबासह म्युन्सीपल कॉलनी परिसरात वास्तव्याला होता. खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करत होता. गुरूवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतला.
हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे हे करीत आहे.