मुंबई ( वृत्तसंस्था ) – मुंबई – पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोर घाटात विचित्र अपघातात सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने आज पहाटे साडेपाचच्या तिघेजण ठार तर सहा प्रवासी जखमी झाले .
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर तब्बल सहा वाहने एकमेकांवर आदळली दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळले . या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला अन्य सहा जण जखमी झाले .या अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.