मुंबई (वृत्तसंस्था) – छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ काही दिवसांपूर्वीच संपला. मात्र, या सीजनची चर्चा अद्याप सर्वत्र सुरूच आहे. यंदा अभिनेता ‘सिद्धार्थ शुक्ला’ बिग बॉस 13 चा विजेता झाला.अश्यातच आता बिग बॉस विनरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. हा बिग बॉस विनर हिंदी नाही तर तेलूगु सीझन 3 चा विनर गायक ‘राहुल सिप्लिगुंज’ आहे. बुधवारी रात्री (दि. 4) एका पबमध्ये राहुलवर हल्ला करण्यात आला. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने राहुलच्या डोक्यात काचेची बॉटल सुद्धा फोडली. सध्या राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शुक्रवारी (दि. 4) राहुल त्याच्या काही मित्रांसोबत एका पबमध्ये गेला होता. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्याला घेराव घालत अचानक मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये राहुलसोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण हल्यात त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.