मुंबई (वृत्तसंस्था ) – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागावे असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करतांना केले.
या महापालिका निवडणूक तुमच्याच जीवावर जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितले आहे. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामे करत राहा, वॉर्डामध्ये फिरा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला आहे. जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. जनतेची कामे करत राहा, सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्ला या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
कुणाच्याही अमिषाला बळी पडू नये असा सल्लाही या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिला . २०१७ ची वॉर्ड रचना ठेवण्याचा आदेश आता एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला विरोध करत शिवसेना न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.