आ. एकनाथराव खडसे यांची तीव्र प्रतिक्रिया
भुसावळ (प्रतिनिधी) :- गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याच दुःख त्यांना नाही. पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दुःख मी अजूनही पचवू शकलेलो नाही, अशा तीव्र शब्दात आ. एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भुसावळ येथे एका कार्यक्रमात आले असताना आ. खडसे यांनी प्रसारमाध्यमांना हि प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यावर आ. खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. नाथाभाऊ वर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याच दुःख त्यांना नाही. पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दुःख मी अजूनही पचवू शकलेलो नाही, असेही आ. खडसे म्हणाले.
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दीड महिना होऊनही खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक व्हावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना शिक्षा कशी होईल या दृष्टीने शासनाने पावलं उचलावी, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.