• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; विविध पोलीस ठाण्यांतील चोरीच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू

मुक्ताईनगर, ( प्रतिनिधी ) :- मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावती शहरातून शोधून काढण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, चोरीच्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला.

दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर शहरातील अक्सानगर परिसरातून टेम्पो कंपनीचे वाहन क्रमांक MH-19/BC-0092 अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत वाहनधारक शेख दानिश शेख साबीर यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी विशेष तपास पथक स्थापन केले.

या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलित केली. फुटेजच्या विश्लेषणातून चोरीला गेलेले वाहन भुसावळच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर भुसावळ, कुऱ्हा पानाचे, जामनेर, पहूर, सिल्लोड आणि खामगाव परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

तपासादरम्यान चोरीचे वाहन शेगाव शहरातील गजानन महाराज संस्थानच्या पार्किंग परिसरात सुमारे पाच तास उभे असल्याचे आढळले. पुढे वाहन अमरावती शहराच्या दिशेने गेल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले.

अमरावतीतून आरोपीला अटक

तपासाची व्याप्ती वाढवून पोलिसांनी अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या स्थानिक पोलिसांची मदत घेतली. अभिलेखावरील गुन्हेगारांची चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे चोरीला गेलेले वाहन अमरावती शहरातील नवसारी परिसरात उभे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. यावेळी इसम नामे मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद युनूस (वय २८, रा. उत्तमचंद प्लॉट, ताराफैल, अकोला) याला अटक करण्यात आली.

तपासादरम्यान अकोला शहरासह आजूबाजूच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आरोपीविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस कर्मचारी व अधिकारी सहभागी होते.

चोरीला गेलेले वाहन शोधून आरोपीला अटक केल्याने मुक्ताईनगर पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

Next Post

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!