• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 12, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची कामगिरी

मुक्ताईगनर (प्रतिनिधी) :- शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अटल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अनेक गुन्ह्यात या चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रामा अण्णा पवार (वय २७, रा. भोकरदन, जि. जालना) असे या चोरट्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरच्या रात्री २ वाजेच्या सुमारास आरोपी राम अण्णा पवार व त्याचा एक साथीदार अशा दोघांनी गोदावरी नगर परिसरात राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी जयश्री थेटे यांच्या घरात कडीकोंडा तोडून प्रवेश घेतला होता. या परिसरात इतर ठिकाणी देखील चोरी करण्याचा त्यांचा मानस होता. अशातच बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला असलेले अतुल बोदडे यांना या घरात चोर लपून बसल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तत्काळ स्थानिक मुक्ताईनगर पोलिस सचिन जाधव, सुरेश मेढे, गोविंदा सुरवाडे यांना फोन करून बोलावून घेतले व सापळा रचत रामा अण्णा पवार यास ताब्यात घेतले. यादरम्यान एक संशयित आरोपी मात्र फरार झाला. दरम्यान, बंद घराच्या मालकीण जयश्री थिटे या पुणे येथे गेलेल्या असल्याने अद्याप पावेंतो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

पोलिस बोदडे यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक

अतुल बोदडे हे बोदवड पोलिस स्टेशनला नेमणुकीला आहेत. मंगळवारी त्यांची सुटी असल्याने ते घरी होते. रात्रीच्या सुमारास थेटे यांच्या घरात कोणीतरी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी इतर स्थानिक कर्मचाऱ्यांना फोन केला असता पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळाकडे रवाना केले. याप्रसंगी आरोपींनी दगड आणि लोखंडी पाइपने देखील मारण्याचा प्रयत्न बोदडे यांना केला, मात्र भीती न बाळगता बोदडे यांनी पवार यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

शेतकरी आत्महत्येच्या ६ प्रस्तावांना मंजुरी

Next Post

जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon