मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेश मधील यमुना एक्सप्रेस हायवेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यूपी पोलिसांच्यावतीने आज धक्काबुक्की करण्यात आली राहुल गांधी हे बलात्कार प्रकरणातील मृत्युमुखी पडलेल्या पीडित मुलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे जात असताना यूपी पोलिसांनी राहुल गांधी यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना जाण्यास रोखले त्यामुळे ते पायी चालत जाण्यासाठी निघाले तरीही ही राहुल गांधी यांना यूपी पोलिसांनी अटक केली या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मुक्ताईनगर मध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत योगी यांचा पुतळा जाळण्यात आला.








