प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळला मृतदेह ; खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरला
मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुंड गावाजवळील पुलाखाली एका प्लॅस्टिकच्या पिशवीत एका ५० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडालेली आहे. महिलेची अशाप्रकारे निर्घृण हत्या कुणी का व कशासाठी केली याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान खुनाच्या घटनांमुळे जिल्हा हादरला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मुक्ताईनगर ते बर्हाणपूर महामाार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्या पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी एका महिलाचा मृतदेह आढळून आला . तिला अतिशय क्रूरपद्धतीने संपवून मारून टाकण्यात आले असून साधारणपणे ५० वर्षीय महिला असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरु होते. यावल , जळगाव , चाळीसगाव आणि आता मुक्ताईनगर येथे खुनाच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.