जळगाव (प्रतिनिधी) – ‘कोरोना’चा धोका अजूनही कायम असताना राज्यावर पूरसंकट कोसळले. ही भीषण परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 61 वा वाढदिवस आज मंगळवार, दि.27 जुलै 2021 रोजी जळगाव शहरात अतिशय साधेपणाने मात्र चैतन्यमय वातावरणात साजरा झाला.


महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मनोभावे अभिषेक, पूजा-विधी संपन्न होऊन आणलेल्या 61 किलो लाडूंचा महाप्रसाद वाटपाचा जळगाव शहर महापालिकेत प्रारंभ करून अधिकारी, कर्मचार्यांत चैतन्यमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकानजीकच्या दत्त मंदिरासमोर, नवीपेठ परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर, मेहरुण परिसरातील हनुमान मंदिर, पाटीलवाडा, महाजनवाडा, फुले मार्केटजवळील टॉवर चौक यासह विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांकडून मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यात आले.

जळगाव शहर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेल्या लाडूंचा महाप्रसाद वाटपावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, उपशहरप्रमुख सौ.ज्योती शिवदे, सौ.सरिता माळी-कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकानजीकच्या दत्त मंदिरासमोर, नवीपेठ परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिर, मेहरुण परिसरातील हनुमान मंदिर, पाटीलवाडा, महाजनवाडा, फुले मार्केटजवळील टॉवर चौक यासह विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांकडून मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी कामना करत महाप्रसादाचा स्वीकार करण्यात आला.







