जळगाव ( प्रतिनिधी ) – अपंग सेवा मंडळ संचलित मुकबधीर विद्यालय येथे जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व महिला पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी व महिला .पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन साजरा करण्यात आला अपंग सेवा मंडळ संचलित मूकबधीर विद्यालय (जळगाव ) येथे मूकबधिर बालिका पूर्वा , स्नेहा, दिक्षा, आलिया, निलोफर, शिफा, आफरिन यांचे पूजन करण्यात आले. त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी जायंटस ग्रुपच्या राजकमल पाटील यांनी सावित्रीबाई फुले जीवन व कार्य यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शे निशात अ रज्जाक मूकबधिर विद्यार्थिनींना सांकेतिक भाषेत स्पष्ट करून सांगत होते. अध्यक्षा मनिषा पाटील व प्रमुख पाहूणे समाज कल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी यांनी मनोगत मांडले. विभावरी पाटील, नेहा जगताप, मनिषा एस पाटील, नूतन तासखेडकर, इंदिरा पाटील , सर्व शिक्षक व मुख्याध्यापक एकनाथ पवार , निता सोमाणी, हेमंत मुंदडा उपस्थित होते.