जळगाव (प्रतिनिधी )-ट्रॅक्टरचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टरखाली चालक दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज आसोदा रेल्वे फाटक येथे घडली असून मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करून एकच आक्रोश केला. विठ्ठल यशवंत रायसिंग (कोळी) (वय-४५, रा. आसोदा ता.जि.जळगाव) असे मयत चालकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, विठ्ठल (कोळी) (वय-४५, रा. हे ट्रक्टर चालक असून ट्रॅक्टर चालवतात. बुधवार २ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कोळी हे जळगावहून आसोदाकडे रिकामे ट्रॅक्टर घेवून जात होते. त्यावेळी आसोदा रेल्वे गेट बंद होते. ट्रॅक्टर थांबवून रेल्वे जाण्याची वाट बघत असतांना ट्रॅक्टरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने त्यांचा ट्रक्टरवरील ताबा सुटला व ते खाली पडले. तेवढ्यात ट्रक्टरचे चाक अंगावरून गेल्याने ट्रक्टर चालक विठ्ठल कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय विद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी सरला, बबलू आणि जयवंत हे दोन मुले आणि विवाहित मुलगी दिपाली, सुन असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.