पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील चिंचपूर गावाजवळील एका शेतातील विहरीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून या महिलेने आत्महत्या केली कि, तिची हत्या करण्यात आली याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
येथून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडील शेतातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास आढळून आला. संबंधित महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, अशी माहिती समोर येत आहे. ही महिला पावरा समाजातील असून तीचा पती आणि ती पिंप्री येथे वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलेचा मृतदेह तरंगतांना काही लोकांना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. मयत महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, ही दुर्घटना विहिरीत हत्या की आत्महत्या?, हे पोलीस तपासातच समोर येणार येईल असे म्हटले जात आहे.