गरजू रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपक्रम, अनेक रूग्णांना दिलासा
जळगाव – शस्त्रक्रियेसाठी किंवा अपघात ग्रस्त रूग्णांना अनेकदा तातडीने एम आर आय स्कॅनची गरज असते अशा वेळी पैसा नसल्याने अनेक रूग्णांची अडचण होतांना दिसून आल्याने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाने सवलतीत एम आर योजना सूरू केली आहे.
एम आर आय करायचा म्हटला तर कमीत कमी ५००० ते ७००० रू मोजावे लागतात पण जळगावमधील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी सवलतीच्या दरात एम आर आय तपासणीची सेवा उपलब्ध आहे. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय तपासण्या परवडणार्या दरात उपलब्ध करून देणे आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे गरजू रुग्णांसाठी एमआरआय तपासणी सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. ही योजना सामाजिक बांधिलकीच्या अंतर्गत राबवली जाते.रुग्णालयात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने पुढील उपचार तातडीने सूरू करता येतात. या योजनेमूळे अनेक रूग्णांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त तपासणी जर करावयाची असल्यास त्यातही सवलत दिली जात असल्याने लवकरात लवकर आजारांचे निदान होउन पुढील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत करण्यात आल्याने रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. ही योजना १५ मे पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन रूग्णालयाने केले आहे. यासाठी आशिष भिरूड यांचेशी ९३७३९५००१२ या क्रमांकवर संपर्क साधावा.