मुंबई (प्रतिनिधी ) – आर्यन खान ड्रग्ज घटनाक्रमात मोहित कंबोज यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करुन बाजू मांडली आहे. समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य मोहित कंबोज यांनी पत्रकारपरिषद घेऊन खोटे आरोप केले. लोकांची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मी उद्या सत्य सर्वांसमोर आणेन, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे .
आर्यन खानचे अपहरण करुन त्याला बेकायदा तुरुंगात डांबल्याने समीर दाऊद वानखेडेची विशेष तपास पथकाकडून चौकशी झाली पाहिजे, या विशेष तपास पथकात केंद्र आणि राज्य दोन्हीकडील अधिकाऱ्यांचा समावेश असावा. मग आपण बघू गाडलेले मुडदे कोण उकरुन काढतो आणि वानखेडे यांच्या आर्मीचा पर्दाफाश करतो, असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देशातील मीडियासमोर साक्षीदार, एनसीबी आणि भाजप कार्यकर्त यांचा संबध आहे असे सांगत यासंदर्भातील फोटो माध्यमांसमोर ठेवले. किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि मनीष भानूशाली हे प्रभाकर साईल याच्या प्रतिज्ञापत्रातून समाोर आले. मी व्हाटस अप चॅट, ऑडिओ क्लिप हे प्रेझेटेशनच्या रुपात समोर मांडणार आहे, असं मोहित कंबोज म्हणाले.
मोहित कंबोज यानं किरण गोसावीचे फोटो माध्यमासमोर मांडले. किरण गोसावी कोण आहेत. मनीष भानुशाली कोण आहे?, कोण आहे प्रभाकर साईल? असा सवाल मोहित कंबोज यांनी विचारला. त्यापूर्वी सुनील पाटील कोण आहेत असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.
आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला.