• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2022
in नवी दिल्ली
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेत नेमकी काय चूक झाली, याच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमधील काँग्रेस सरकारला हा झटका आहे.

यापूर्वी पंतप्रधानच्या सुरक्षेवरून पंजाब सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आले होते. पंजाब सरकारनेही एक समिती बनवली. त्यात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि पंजाबचे गृहसचिव होते. केंद्राच्या समितीमध्ये गृहमंत्रालयाचे अधिकारी होते. मात्र, दोन्ही पक्षांनी परस्परांवर पक्षपातीपणाचा आरोप केला होता.

5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान मोदी राजकीय रॅलीला संबोधित करणार होते. आधी ठरल्याप्रमाणे मोदींनी हेलिकॉप्टरने सभास्थळी पोहोचणे अपेक्षीत होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यात अचानक बदल झाला आणि वाहनांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रवासात हुसैनीवालापासून 30 कि.मी. अंतरावर मोदींच्या गाड्यांचा ताफा थांबवावा लागला आणि त्याला कारण होते ते स्थानिकांनी चालवलेले आंदोलन. ह्या आंदोलकांनी मोदींचा रस्ता ब्लॉक केला. वीस मिनिटांपर्यंत ताफा एका पुलावरच थांबून राहिला. शेवटी मोदी नाईलाजास्तव दौरा अर्धवट सोडून भटिंडा एअरपोर्टवर पोहोचले. दिल्लीला बसण्यापूर्वी त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जीवंत परतलो अशा आशयाचे वक्तव्य केले.

पंतप्रधान सुरक्षा चौकशीसाठी आता सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. या समितीत राष्ट्रीय तपास संस्थेचे डीजी आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या चंदीगड आणि पंजाब युनिटचे अतिरिक्त डीजी यांचाही समावेश असेल. निगडीत सारे रेकॉर्ड समितीच्या अध्यक्ष इंदू मल्होत्रा यांच्याकडे द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

समितीमध्ये हायकोर्टाचे जनरल रजिस्ट्रारही आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतच्या स्थापन केलेल्या समितीने लवकरात लवकर अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना कधीपर्यंत अहवाल द्यावा, याची मुदत देण्यात आली नाही. ही समिती सुरक्षेत काय चूक झाली, कडेकोट सुरक्षा करण्यासाठी काय-काय करता येऊ शकेल, हे सुद्धा सुचवणार आहे


 

Tags: #new delli
Previous Post

कजगावच्या उपसरपंचपदी खुशाल भोई

Next Post

एल एच पाटील इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एल एच पाटील इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत
1xbet russia

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

July 4, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार
1xbet russia

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

तरुणाचा गोळी घालून खून : कन्नड घाटातील प्रकरणात संशयित आरोपी अटकेत

July 4, 2025
राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon