चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – येथील बसस्थानकावर चोरी करणाऱ्या संशयित चोरट्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.
चाळीसगाव येथील बसस्थानक परिसरात चोरट्याने विद्यार्थ्याच्या खिशातून ७ हजार ५०० रुपयांचा मोबईल चोरल्याची घटना घडली होती. या संदर्भात तांबाळे येथील भीमराव पाटील यांच्या फिर्यादिवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने मालेगाव शहरातील इजहार अशरफ नगरमधील संशयित अब्दुल समद अब्दुल रजाक याला ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस खाक्या दाखवताच या चोरटयाने मोबाईल लंपास केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.