जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील हॉटेल स्टार पॅलेसमधून कामगाराचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश कैलास चौधरी (वय-२८ , रा. नम्रता नगर, एरंडोल ) हा तरूण जळगाव शहरातील हॉटेल स्टार पॅलेस येथे नोकरीला आहे. २३ ऑक्टोबररोजी सकाळी ५.४० वाजेच्या दरम्यान जयेश चौधरी झोपलेला असतांना त्याच्या उशीजवळ त्याचा १० हजार रूपये किंमतीचा ठेवलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे. जयेशने हॉटेल परिसरात मोबाईलची शोधाशोध केली मात्र मोबाईल सापडला नाही. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना महेंद्र पाटील करीत आहेत .