जळगाव (प्रतिनिधी ) – पिंप्राळा येथील भाजी बाजारातून एका तरूणाचा ४३ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , प्रशांत रामकृष्ण निखाडे (वय-३३) रा. देवराम नगर, कमला पार्क, जळगाव हे खासगी नोकरी करतात. पिंप्राळा येथे बुधवारचा भाजी बाजार असल्याने ते सांयकाळी ६ वाजता भाजीपाला बाजारात आले होते. त्यावेळी त्यांच्या खिश्यातील ४३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहे.