अमरावती – लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी नवनीत राणा यांनी भव्य रॅली काढली होती. या रॅलीत एकूण 17 जण उपस्थित होते. आदर्श आचरसंहितेतील कलम 144 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 200 मीटर परिसरात फक्त 5 लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी असते.
नवनीत राणा यांनी मात्र भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केलंय.







