पुणे – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाहीये. जितकी माहिती माझ्याकडे होती ती मी तुम्हाला दिलीये.’
पवार पुढे म्हणाले, राजकारणात अनेक भेटीगाठी होत असतात. भाजपाचं सरकार असताना आम्हीही लोकप्रतिनिधीच्या नात्याने अनेकदा भेटी घेतल्या होत्या.