बील मागे घेण्याची मागणी ; शहरात काढली सायकल रॅली
जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारले असून त्याला स्थानिक पातळीवर युवक काँग्रेसने मशाल मोर्चा काढून सहभाग नोंदविला. या विधेयकाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील व उपाध्यक्ष इम्रान खान रशीद खान यांच्या नेतृत्वात यावलमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला. यापूर्वी रोजगाराच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही केंद्र सरकारविरोधात जळगाव शहरामध्ये मोटार सायकल रॅली काढून निदर्शने केली होती. आज शेतकर्यांसाठी निषेध सुरू झाला आहे.
शेतकर्यांच्या मंड्या संपतील, आधारभूत किमंतही संपेल, कृषी विधेयक आणून भाजपा सरकारने काळ्या बाजाराला जवळ असलेल्या बड्या उद्योजकांना परवानगी दिली आहे, यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनांची खुली लूट होईल, शेतकर्यांकडून स्वस्त वस्तू खरेदी करून मोठ्या व्यापार्यांकडून गोदामांमध्ये जमा केल्यावर बाजारात कृत्रिम कमतरता निर्माण करून जनतेची फसवणूक होईल, हवामानास सामोरे जाणार्या शेतकर्याला दिलासा देण्याऐवजी त्याचे शोषण करण्यास केंद्र सरकार झुकले आहे. असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.
काँग्रेस पक्ष सातत्याने या विधेयकाला विरोध करीत आहे आणि त्यांनी राष्ट्रपतींनाही या विधेयकावर स्वाक्षरी न करण्याचे आवाहन केले आहे. आज 25 सप्टेंबर ला शेतकरी संघटनेनेही देशव्यापी बंदची हाक दिली आहे ज्यात युवक काँग्रेस आपले पूर्ण समर्थन दिले आहे. या मोर्चात जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान रशीद खान, भुसावळ विधानसभा अध्यक्ष इम्रान खान इद्रिस खान, शहरअध्यक्ष राजू पिंजारी व इतर काँग्रेसच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात मशाल घेऊन कृषी विधेयकाचा विरोध केला आणि हे बिल मागे घ्यावे अशी मागणी केली आहे.