भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वराडसीम येथे गावठी कट्टा बाळगणार्या दोघांना नऊ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तर गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.
तालुक्यातील वरडसीम येथील पाण्याच्या टाकीजवळ राजेश रमेश तायडे(वय २७, रा.पाडळसे, ह.मु.असोदा), सचिन संतोष सपकाळे (वय २६, रा. वराडसिम) हे गैरकायदा विना परवाना १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा बळगतांना मिळून आले. पुन्हा 20 रोजी राजू टाक रा. वाल्मिक नगर व मयूर कैलास सपकाळे रा. वराडसीम या दोघांना अटक करण्यात आली आहे . या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 28 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे .
ही कारवाई डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामकृष्ण कुंभार, सपोनि रुपाली चव्हाण व पोलिस पथकाने केली आहे