सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) – भाजप आ. नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.
आज, सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत.
भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी काल (सोमवारी) पूर्ण झाली होती. आज सकाळीच नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परब यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.