जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील महात्मा गांधी पुस्तकालय आणि लेखक यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक मिथुन ढिवरे यांच्या “जनमानसांतील तुकोबा” पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी पुस्तकालयाच्या हॉलमध्ये करण्यात आले. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी म्हणून ऍड. आनंद मुजुमदार, प्रा. एन. व्ही. भारंबे आणि प्रा. दिगंबर कट्यारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. साहेबराव भुकन, सिनेट सभासद, उमवि, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. “वाचन संस्कृती टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे” असे वक्त्यांनी सांगितले. “आताच्या काळात सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा शब्द आणि शब्द लागू पडतो” असे मत प्रा. डॉ. साहेबराव भूकन यांनी मांडले.