मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या हस्ते आज होणार पुरस्काराचे वितरण
जळगाव ( प्रतिनिधी ) – आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत मिलिंद लोणारी आरोग्य सेवक (प्रभारी) प्रसिद्धी माध्यम अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सोमवारी दि.23 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई येथील रंगशारदा सभागृह होणार्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलिंद लोणारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.