जिल्हा प्रशासनातर्फे कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव एमआयडीसीमधील आस्थापनांमध्ये पाणी संपण्याचा धोका निर्माण झाला होता. त्या कारखान्यांतील कामगारांच्या जीवनमानाचे रक्षण व्हावे आणि व्यवसायात सुलभता यावी यासाठी प्रशासनाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश मिळाले होते. पाटबंधारे विभागाने सोमवारी सकाळी ६ वाजता गिरणा धरणातून १५०० क्युसेस पाणी सोडले. पावसाचे प्रमाण सुधारले आहे आणि आता पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगासाठी पुरेसे पाणी आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.